Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीमहादेव जुगार ॲप आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद चा भाऊ..

महादेव जुगार ॲप आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद चा भाऊ..

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची गरमागरमी आणि प्रस्तावावर चर्चा सुरू असताना आज काही लक्षवेधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतल्या.या लक्षवेधी मध्ये महादेव ॲप या जुगार कंपनीची व्याप्ती कशी होती हे सभागृहात सांगण्यात आले. महादेव ॲप च्या माध्यमातून प्रति महिना ४५० कोटी रुपयांचा फायदा गोळा करणाऱ्या या जुगार कंपनीचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ मुस्ताकीन यांचा असलेला संबंध सभागृहात उघड करण्यात आला.त्याचप्रमाणे या कंपनीतील पैसा राज्याचा आणि देशाचा कर बुडवून रियल इस्टेट मध्ये कशा पद्धतीने गुंतवला जातोय याबाबत सुद्धा चर्चा झाली. येत्या दोन महिन्यात या कंपनीच्या राज्यातील व्यवहारांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आशिष शेलार यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना ही कंपनी साउथ अमेरिकेत रजिस्टर झाली आणि दुबई येथून यंत्रणा हलवली जात होती. देशातील ए यू स्मॉल फायनान्स बँक मध्ये हजारो बनावट खाते खोलून आर्थिक व्यवहार केला जातो होता. बांगलादेशी नागरिकांची बनावट कागदपत्रे बँक मध्ये सादर केली जातात आणि खाती खोलली जातात.अशा पद्धतीचा हा घोटाळा होतो अशी माहिती विधानसभेत दिली.

67 वेब पोर्टल स्थापन करून माया जमवण्याचे महादेव जुगार कंपनीचे फंडे विधानसभेत स्पष्ट करण्यात आले. जंगली रमी, इलेव्हन अशा ऑनलाइन जुगार पद्धतीच्या कंपन्यांवरही कारवाई होण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. आमदार बच्चू कडू यांनी या चर्चेत सहभागी होत तशी मागणी केली.काही ऑनलाईन जुगार पद्धतीच्या कंपन्यांमध्ये देशातील मोठमोठे कलाकार आणि खेळाडू जाहिरात बाजी करतात आणि सामान्य जनतेला प्रभावित करतात,अशा लोकांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेम खेळण्यावर बंदी घालू शकत नाही कारण हा देश पातळीवरील कायद्याच्या अंतर्गत येणारा विषय आहे.मात्र केंद्र सरकार यावर बंधने आणण्याचा प्रयत्न करत आहे. तशा पद्धतीचे कायदे तयार करत आहे अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महादेव ॲप मधील मुख्य आरोपी रवी उप्पल याला अटक झालेली आहे तर दुसरा आरोपी अमित शर्मा हा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे आणि या महादेव ॲप मध्ये दाऊद इब्राहिम याच्या भावाची पार्टनरशिप आहे. महादेव ॲप मधील हजारो कोटी रुपये विजय जैन यांच्या जीपी इन्फ्रा मुंबई या बांधकाम व्यवसायात गुंतवलेले आहे. अमित शर्मा आणि विजय जैन यांचा दिंडोशी मुंबई येथे जे.पी. डेक हा बांधकाम प्रकल्प सुरू असून ररेश शहा एडल वाईस या फायनान्स कंपनीने निधी पुरवलेला आहे. अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरवल्या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई केली जाणार.केंद्र सरकारने यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे.मात्र राज्य सरकार या प्रकरणाची अधिकची चौकशी करून दोन महिन्यात कारवाई करणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी आमदार आशिष शेलार, यांच्यासह बच्चू कडू , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चेत भाग घेतला होता.

दरम्यान सायबर सेक्युरिटी चा प्रश्नही यावेळी चर्चेला गेला प्रत्येकाचा पर्सनल डेटा हॅक केला जातो. यावर बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कोणताही डेटा लिक होऊ नये, त्याचा गैरफायदा दुसऱ्याने घेऊ नये यासाठी कायदा आणि व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्न गृहमंत्रालयाचे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी कोयना धरणातील पाणी कृष्णा नदीला सोडण्यावरून चर्चा झाली. आमदार जयंत पाटील यांनी तो मुद्दा लक्षवेधी केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना कोणत्याही जिल्ह्याचे हक्काचे पाणी तोडले जाणार नाही. वेळ प्रसंगी वीज निर्मितीसाठी पाणी कमी करू मात्र पिण्याचे पाणी जनतेला कायम देऊ.त्यात दिरंगाई केले जाणार नाही.शेतीसाठी पाणी पुरवठा करणार कृष्णा नदी कोरडी होऊ देणार नाही. सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यांना पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाईल असे स्पष्ट केले.या विषयावरही अनेक आमदारांनी आपली मते मांडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -