नवी दिल्ली: २२ जानेवारी २०२४ला अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामाची प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे. या भव्य कार्यक्रमात सामील होण्यासाठी देशभरातील लोक अयोध्येत जाणार आहेत. या कार्यक्रमात लोकांना अयोध्येत जाण्यासाठी आता एअरलाईन्सनेही कंबर कसली आहे. खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी एअरलाईनस इंडिगो ३० डिसेंबर २०२३ पासून दिल्ली आणि अहमदाबाद येथून अयोध्येला जाण्यासाठी फ्लाईट ऑपरेशनची सुरूवात करत आहे.
२९९९ रूपयांत दिल्ली ते अयोध्या उड्डाण सेवा
इंडिगोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या अधिकृत हँडलवरून दिल्ली आणि अहमदाबाद येथून अयोध्येला जाण्यासाठी उड्डाण सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे. इंडिगोने लिहिले की ३० डिसेंबर २०२३ पासून इंडिगो अहमदाबाद येथून अयोध्या आणि दिल्ली येथून अयोध्येला जाण्यासाठी फ्लाईट लाँच करत आहे. एअरलाईन्सने सांगितले की २९९९ रूपयांपासून ही सेवा मिळणार आहे. https://www.goindigo.in या वेबसाईटवरून तुम्ही तिकीट बुक करू शकता. इंडिगोने सांगितले की २९९९ रूपयांचे तिकीट ३० डिसेंबर २०२३पासून लागू होईल. हे तिकीट वनवे फेअर लिमिटेड सीट्ससाठी आहे.
६ जानेवारीपासून कमर्शियल फ्लाईट्स
दिल्लीवरून अयोध्येला जाण्यासाठी कमर्शियल फ्लाईट्सची सुरूवात ६ जानेवारी २०२४पासून होईल. ६ जानेवारी २०२४ला दिल्ली वरून अयोध्येसाठी प्रवाशांना ७७९९ रूपये मोजावे लागतील. दिल्लीवरून ही फ्लाईट सकाळी ११.५५ ला रवाना होईल आणि दुपारी १.१५ मिनिटांनी अयोध्येत पोहोचेल. ११ जानेवारी २०२४ पासून अहमदाबादवरून अयोध्येसाठी दर आठवड्याला तीन फ्लाईट्स उड्डाण करतील.
Launching flights to #Ayodhya from #Ahmedabad and #Delhi starting 30th December 2023. Fares starting at ₹2,999. Book now https://t.co/kQiEKSPfat. #goIndiGo #NewDestination #IndiaByIndiGo pic.twitter.com/L4p1iMHm1R
— IndiGo (@IndiGo6E) December 14, 2023
पंतप्रधान मोदी करणार एअरपोर्टचे उद्घाटन
अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबरच्या अखेरीपर्यंत तयार केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानतळाचे उद्घाटन करतील असे बोलले जात आहे. तर अयोध्येतही राम मंदिराची निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.