मुंबई: नारळाचे पाणी(coconut water) हे पोषणतत्वांनी भरलेले असते जे आपल्या आरोग्यासाठी(health) अतिशय फायदेशीर आहे. हे एक चांगले पेय आहे जे लोक उन्हाळ्याच्या दिवसांत पितात मात्र नारळपाणी केवळ गरमीच्याच दिवसांत पिऊ नये तर प्रत्येक मोसमात प्यायले पाहिजे. कारण नारळपाणी केवळ तहानच भागवत नाही तर अनेकदृष्ट्या हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.
जर तुम्हाला हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक प्यायचे असेल तर नारळपाणी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या नारळपाणी पिण्याचे ५ फायदे
त्वचेचे आरोग्य
नारळपाणी तरल पदार्थांचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंटमुळे तुमच्या फाईन लाईन्स तसेच सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचते. यातील व्हिटामिन सी आणि ई असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात.
किडनी स्टोनपासून बचाव
किडनी स्टोनपासून बचावासाठी डॉक्टर तुम्हाला खूप पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला थोडे नारळपाणीही प्यायला हवे. यामुळे युरिनची फ्रिक्वेन्सी वाढते आणि स्टोन बनवणारे खनिजे कमी होतात.
पाचनक्रिया सुधारते
नारळपाण्यामध्ये फायबर असते जे पाचन सुधारण्यासाठी मदत करतात. यात एन्झाईम असतात जे जेवण पचवण्यास मदत करतात. यामुळे पोटाचे आजार दूर होतात.
इलेक्ट्रोलाईट संतुलन
नारळपाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते हे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाईट आहेत जे शरीरात द्रव संतुलन नियमित करण्यास मदत करतात. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
ब्लडप्रेशर नियंत्रित
नारळ पाणी ब्लडप्रेशर कमी कऱण्यासही मदत करते. खासकरून ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे चांगले आहे.