Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी'डंकी'च्या रिलीजआधी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोहोचला शाहरूख, सुहानानेही घेतले दर्शन

‘डंकी’च्या रिलीजआधी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोहोचला शाहरूख, सुहानानेही घेतले दर्शन

मुंबई: शाहरूख खान(shah rukh khan) सध्या आपला आगामी सिनेमा डंकीमुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २१ डिसेंबरला थिएटर्समध्ये रिलीज होत आहे. त्याआधी शाहरूख खानने मुलगी सुहानासोबत गुरूवारी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जात पूजा-अर्चा केली. एएनआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओत शाहरूख खान आणि मुलगी सुहाना मंदिरात जाताना दिसत आहेत.

शाहरूख खानचा सिनेमा डंकीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यातीलअनेक गाणीही रिलीज झाली आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. आता रिलीजआधी शाहरूख खानने आपली मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानीसोहत शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. मंदिरात पुजा करून निघण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

व्हिडिओत शाहरूख खान व्हाईट टी शर्ट घातलेला दिसत आहे तसेच गळ्यात साईबाबांची चुनरी घातलेला दिसत आहे. तर सुहाना खान लाईट ब्लू कलरच्या सूटमध्ये खूपच सिंपल लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओत शाहरूख खानला आपल्या मुलीला गर्दीपासून वाचवताना दिसत आहे.

शाहरूख खानचा सिनेमा डंकी राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात शाहरूखसोबत तापसी पन्नू हिची केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर सुहानाबाबत बोलायचे झाल्यास तिने नुकताच द आर्चीस या सिनेमात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -