Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीKurla Fire : लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये भीषण आग

Kurla Fire : लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये भीषण आग

कँटीन जळून खाक 

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कँटीनला आज दुपारी भीषण आग लागली. कँटीनला लागलेली आग ही वेटिंगरुमपर्यंत पसरली. आग इतकी भीषण होती की कँटीन जळून खाक झाले असून धुराचे मोठे काळे ढग दूरवरुन दिसत होते.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर दरदिवशी लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ शेजारील कँटीनमध्ये आग लागली. ही आग काही क्षणांतच वेटिंगरुमपर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. त्याचबरोबर स्थानिक पोलीसही दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळाल्याशिवाय या घटनेत कोणती जीवितहानी झाली आहे का याची माहिती समोर येऊ शकणार नाही. तसेच अद्याप या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -