Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

घेतला 'हा' मोठा निर्णय


नागपूर : संसदेत (Sansad) लोकसभेच्या (Loksabha) कामकाजादरम्यान दोघांनी आतमध्ये घुसून स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) एक निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी हा निर्णय घेतला आहे.


संसदेमध्ये धूर करणारे दोघजण हे एका खासदाराच्या पासेसच्या आधारे संसदेत आले होते. ते कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. त्यावेळीच त्यांनी संधी साधत थेट सभागृहात उडी मारली आणि कोणालाही काही कळायच्या आत स्मोक कँडल्स फोडून धूर केला. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आता गॅलरी पासेस देणं बंद केलं आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास मिळणार नसल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधीमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

Comments
Add Comment