नवी दिल्ली: हाय सिक्युरिटी असलेल्या संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीवरून अनेक सवाल केले जात आहेत. यातच न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की या संपूर्ण घटनेत सहा जण सामील होते. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.
यांची नावे सागर, विक्रम, नीलम, अमोल आणि मनोरंजन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि गुरूग्रामच्या सेक्टर ७च्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये एकत्र थांबले होते.हे घर विक्रमचे होते. येथे संसदेच्या आत घुसण्याबाबतचा कट रचण्यात आला होता.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांकडून कोणताही मोबाईल फोन मिळालेला नाही. चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलीस पकडलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनचा शोध घेत आहे.
चारजण ताब्यात
ज्या पाच जणांना पोलिसांनी पकडले आहे त्यातील दोघांनी लोकसभेच्या दर्शक दीर्घा येथून उडी घेतली आणि जमिनीवर उडी मारली.या दोघांची ओळख मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहे. तर संसद परिसरात आंदोलनादरम्यान कॅन घेऊन धूर सोडणाऱ्यांची ओळख हरयाणातील जिंद जिल्ह्यातील खुर्द गावातील निवासी निलम आणि महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे अशी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे चारही जण विविध शहरातील आहेत. असे असतानाही ते सगळे एकमेकांना कसे ओळखत होते असा सवाल आहे. जर चारही जण एकमेकांना ओळखत होते तर यांचा हेतू काय होता? किती वेळात त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याची प्लानिंग केली. हे सगळे सवाल उपस्थित केले जात आहेत.