Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Nitesh Rane : आदित्य ठाकरेला 'लूक आउट नोटीस द्या'

Nitesh Rane : आदित्य ठाकरेला 'लूक आउट नोटीस द्या'

पासपोर्ट जप्त करण्याची मागणी आमदार नितेश राणे सरकारकडे करणार


दिशा सालियान प्रकरण नागपूरात तापले


संतोष राऊळ


नागपूर (विधानभवनातून) : दिशा सालियान प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नागपूर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.



दिशा सालियान प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आणि त्यात तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे.


सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतून सगळी सत्यता बाहेर येईल. आपला मुलगा आरोपी असल्याने उद्धव ठाकरे त्यांचा बचाव करीत आहे. दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.


मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपपत्र देण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच देण्यात यावे. रोहित पवार यांच्या मोर्चावर झालेला लाठीमार नियोजित होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


‘संजय राऊत यांचे बंधू मशाल चिन्हावर लढण्यास तयार नाही. त्यांच्या घरी यावरूनच वाद सुरू आहे. त्यांच्यापैकी कोण कुठून लढेल, हा निर्णय राऊतांनी आधी करावा’, असेही राणे म्हणाले.

Comments
Add Comment