Wednesday, July 3, 2024
Homeदेशछत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री घेणार शपथ, पंतप्रधान मोदींसह हे नेते...

छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री घेणार शपथ, पंतप्रधान मोदींसह हे नेते असणार सहभागी

नवी दिल्ली: मध्य प्रदेश(madhya, छत्तीसगड आणि राजस्थानात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. या तीन हिंदी भाषिक राज्यांपैकी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीगडचे नवे मुख्यमंत्री विष्णूदेव राय बुधवारी शपथ घेतील.

मध्य प्रदेशात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, हे दोन्ही नेते यादव यांच्यासोबत शपथ घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. छत्तीसगडबाबत बोलायचे झाल्यास विष्णूदेव साय यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही रायपूरच्या सायन्स कॉलेज मैदानात शपथ घेतील.

शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक नेते सामील होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये कोण बनणार मंत्री?

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या नव्या मंत्रिपरिषदेत नवे चेहरे आणि जुन्या नेत्यांचे मिश्रण असू शकते. नियमानुसार छत्तीसगड मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीसह अधिकाधिक १३ मंत्री असू शकतात.

भाजपने किती जागा जिंकल्या?

भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर केले तर मध्य प्रदेशमध्ये सत्ता कायम राखली. छत्तीसगडमधील ९० जागांपैकी भाजपने ५४ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसच्या खात्यात ३५ जागा जमा झाल्या. मध्य प्रदेशबाबत बोलायचे झाल्यास २३० जागांपैकी भाजपने १६३ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला केवळ ६६ जागा मिळवता आल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -