मुंबई: भारतीय संघातील स्टार क्रिकेटर केएल राहुलवर अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र नेहमीच तो यावर शांत राहिला आहे.
राहुलने विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. मात्र या टीकेवर आता त्याचे सासरे सुनील शेट्टीने मौन सोडले आहे. बॉलिवूड दिग्गज सुनील शेट्टीने न्यूज एजन्सी एनआयला सांगितले की, राहुलपेक्षा १०० पटींने मला जास्त त्रास होतो. दरम्यान, राहुल मला सांगेल की यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. माझे बॅटच टीकाकारांना उत्तर देईल.
सुनील पुढे म्हणाला, लोकांना, सिलेक्टर्स आणि कॅप्टनला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर राहुल आणि अथियाला कोणी दु:ख देत असेल त्याने मला १०० पट जास्त वाईट वाटते.जेव्हा भारतीय संघ खेळतो तेव्हा तो थोडा अंधविश्वासू होते. त्याने संपूर्ण विश्वचषक आणि सामने आपली पत्नी माना शेट्टीसोबत रुममध्ये जमिनीवर बसून पाहिले.
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला बराच काळ डेट केल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये लग्न केले होते. यंदाच्या विश्वचषकात केएल राहुलने ११ सामन्यातील १० डावांमध्ये ४५२ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ७५.३३ इतकी होती. राहुलने १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली होती.