नाशिकच्या अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर त्वरित कारवाई करण्याची आमदार नितेश राणे यांची मागणी
नागपूर : महाराष्ट्रातील काही ठिकाणे अमली पदार्थांचे अड्डे बनत चालते असून नाशिक येथील भद्रकाली या ठिकाणी तर खुलेआम त्याची विक्री केली जात असल्याचे आज भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले व त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
ते म्हणाले की, नाशिक येथील भद्रावती येथे एमडी व इतर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेऊन रात्री उशिरापर्यंत अमली पदार्थ मिळतात. आपण याची तक्रार तेथील पी आय पाटील यांच्याकडे केली असता कालपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही. महाराष्ट्र हा आता अशा अवैध धंद्यांचा अड्डा बनू पाहत असून काही अल्पसंख्यांक समाजातील लोक यांच्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत गृहखात्याने लक्ष घालून यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.
भद्रकाली पोलिस झाले सजग, मनपा भानावर येईना; पंधरा हॉटेल्सला नोटीस, केवळ शॉप ऍक्टवर चालतो व्यवसाय