नवी दिल्ली: सरकारचा सामाजिक सुरक्षा प्रमुख कार्यक्रम अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवायअंतर्गत नोंदणीकृत लोकांची संख्या ६ कोटीहून अधिक झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेत ७९ लाख लोकांनी नोंदणी केली. अर्थ मंत्रालायाने ही माहिती दिली.
अटल पेन्शन योजना ९ मे २०१५मध्ये लाँच करण्यात आली होती. या योजनेचा हेतू देशातील नागरिक खासकरून गरीब, वंचित तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर इनकमची सुविधा उपलब्ध करून देणे.
कोण करू शकते गुंतवणूक
१८-४० वर्षापर्यंतचे लोक यात गुंतवणूक करू शकतात. वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीच्या योगदानाच्या आधारावर १००० ते ५००० पर्यंत मासिक पेन्शनची गॅरंटी दिली जाते. तर सबस्क्रायबरचा मृत्यू होत असेल तर ही पेन्शनची रक्कम त्याच्या साथीदाराला दिली जाते.
दररोज ७ रूपयांची बचत देऊ शकते महिन्याला ५००० पेन्शन
जर एखादी व्यक्ती १८ वर्षांची आहे आणि तिला वयाच्या ६०नंतर ५००० रूपयांची पेन्शन मिळवायची आहे तर त्या व्यक्तीला दर महिन्याला २१० रूपये जमा करावे लागतील.