Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीधरणगाव येथील भारत विरोधी घोषणांचा 'तो' विषय विधान परिषदेत गाजला

धरणगाव येथील भारत विरोधी घोषणांचा ‘तो’ विषय विधान परिषदेत गाजला

गृहमंत्र्यांनी दिले कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश

नागपूर : धरणगाव येथील मुस्लीम समाजाच्या रॅलीत भारत विरोधी घोषणा दिल्याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

धरणगाव शहरात मुस्लीम समाजाची रॅली (जुलूस) दिनांक ०८/११/२०२३ रोजी निघाली होती. सदरची रॅली ही पोलीस प्रशासनाच्या परवानगीने निघालेली होती व सदर रॅली वेळी पोलीस बंदोबस्त देखील होता व पोलीस निरीक्षक सदर ठिकाणी हुद्द्द्याने जातीने हजर देखील होते. असे असतांना सदर रॅली वेळी जैन गल्ली व बाजार पेठेत असतांना त्यातील समाजकंटकांनी पॅलेस्टीन व तेथील हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या तसेच पॅलेस्टीन व हमासचे झेंडे देखील सदर वेळी फडकाविले गेले. त्यात भारत विरोधी घोषणा देखील दिल्या गेल्या. हा सर्व प्रकार व घटनाक्रम बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वांसमक्ष घडलेला असताना पोलीस निरीक्षक म्हणतात असे घडले नाही, ही अतिशय लाजिरवाणी, निंदनीय तसेच धोकादायक बाब आहे.

त्यानंतर सदर विषयांमध्ये धरणगाव राष्ट्रीय सुरक्षा मंच यांनी मोर्चा काढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. तरी देखील पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचे टाळले. यामध्ये असे निदर्शनात आले की धरणगाव येथील पी आय यांनी जिल्हा एसपी यांना चुकीची माहिती दिल्यामुळे कारवाई न झाल्याचे समजते.

त्यानंतर संबंधित सदर विषय हा विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडला आणि सभागृहात गृहमंत्री असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विषयात एसपी यांना सदर घटनेबाबत तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून यामध्ये सदर पीआय यांच्यावर व गुन्हे दाखल होतात की नाही नेमकी काय कार्यवाही होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -