Friday, July 11, 2025

Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही

Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही
मुंबई: जिओ(jio) वापरणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्जबाबत सांगत आहोत. या रिचार्जची किंमत केवळ ७५ रूपये आहे.

मिळणार बरंच काही


७५ रूपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMSची सुविधा मिळणार आहे. सोबतच ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

प्लानची किंमत


जिओच्या ७५ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सला एकूण २३ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळेल.

किती मिळणार इंटरनेट डेटा?


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यात दररोज १०० एमबी डेटा मिळेल. याशिवाय २०० एमबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.

दररोज किती मिळणार एसएमएस?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळेल. हे त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्हॉट्सॲपचा वापर करत नाहीत.

या ॲप्सचा मिळणार ॲक्सेस


जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करता येणार आहे.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी?


जिओफोनचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

किती मिळणार इंटरनेट?


९१ रूपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळणार आहे. यात युजर्सला डेली १०० एमबी डेटा मिळणार आहे.
Comments

Ravindra Patil    December 19, 2023 10:16 PM

Good news

Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >