Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाIND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा टी-२० सामना,...

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा टी-२० सामना, कशी असणार प्लेईंग ११?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. येथे टीम इंडिया आज आफ्रिकेविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळत आहे. भारतीय संघ या दौर्यावर ३ सामन्यांची टी-२० मालिका, ३ वनडे मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेची सुरूवात झाली आहे आणि त्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

आता या मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना ग्केबरहाच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये खेळवला जाईल. या मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी आपल्या आपल्या संघासाठी नवा संघ आणि नवा कर्णधार निवडला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे तर आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्करमच्या हाती देण्यात आले आहे. जाणून घ्या या सामन्यसाठी प्लेईंग इलेव्हन कशी असणार.

टीम इंडियाची स्क्वॉड आणि प्लेइंग इलेव्हन

स्क्वॉड: यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, दीपक चाहर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, इशान किशन, मुकेश कुमार, वाशिंगटन सुंदर, रुतुराज गायकवाड़ ,तिलक वर्मा,कुलदीप यादव

प्लेइंग-11: यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड़/शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, कुलदीप यादव/रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

साउथ अफ्रीकेची स्क्वॉड आणि प्लेइंग इलेवन

स्क्वॉड: रीजा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रीट्ज़के, ट्रिस्टन स्टब्स, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, केशव महाराज, गेराल्ड कोएट्जी, नांद्रे बर्गर, तबरेज शम्सी, ओटनील बार्टमैन, मार्को जानसन, डोनोवन फरेरा, लिज़ाद विलियम्स

प्लेइंग-11: रीजा हेंडरिक्स, मॅथ्यू ब्रीटज्के, एडन मारक्रम, हेनिरक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, डोनोवन फेरिएरा, मार्को यान्सिन/ आंदिले फेहलुख्वायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्जी, नांद्रे बर्गर, तबरेज शम्सी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -