
नवी दिल्ली : हिवाळा सुरू होताच कोरोनाने (Corona) डोके वर काढले असून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १,०१३ वर पोहोचली आहे. दररोज १०० हून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,३३,३०७ आहे.