मुंबई: हल्ली तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की प्रत्येक गोष्ट आता शक्य झाली आहे. याचेच जिवंत उदाहरण कॅनडामध्ये पाहायला मिळाले. कॅनडाच्या नोवा स्कोटियाच्या हॅलिफेक्समधील एक जुने हॉटेल चक्क हलवून शिफ्ट केले आहे. यासाठी साबणाच्या तब्बल ७०० वडी वापरण्यात आला. खरंतर हे हॉटेल तोडले जाणार होते मात्र एका युक्तीने हे ऐतिहासिक हॉटेल तुटण्यापासूनच वाचले नाही तर वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले.
ही इमारत १८२६मध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत व्हिक्टोरियन एल्मवूड हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आले होते. मात्र २०१८मध्ये या इमारतीला पाडण्याचे आदेश देण्यात आले. अशातच एका रिअल इस्टेट कंपनी गॅलॅक्सी प्रॉपर्टीजने ही इमारत नव्या ठिकाणी नेण्याचे सांगत याला खरेदी केली.
ही इमारत शिफ्ट करण्याची संपूर्ण जबाबदारी एस रुश्टन कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. ही कंपनी इमारतींना एका जागेवरून दुसऱ्या जागी शिफ्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान २२० टनचे हॉटेल शिफ्ट करणे प्रचंड आव्हानात्मक होते.
एल्मूड हे एक २२० टनाचे विशाल स्ट्रक्चर आहे. मात्र रश्टन कंपनी यासाठी तयार होती. त्यांनी फेसबुकवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आङे. यात त्यांची क्रिएटिव्हिटी पाहता येते.
नेहमीच्या रोलर्सचा वापर करण्याऐवजी यात ७०० आयव्हरी सोपने बनवण्यात आलेले युनिक सॉल्युशन बार वापरण्यात आले. नरम साबणाच्या पट्ट्यांनी इमारतीचे दोन एक्सकेवेटर्स आणि एका टो ट्रकने खेचणे शक्य झाले. साबणाच्या कोमलतेमुळे हे सहज ३० फुटांपर्यंत खेचता येणे शक्य झाले.