Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Sharad Pawar : जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

Sharad Pawar : जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाकडे?


मुंबई : दिल्ली येथे १९ तारखेला होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा पडला आहे. पवारांच्या या विधानाने महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.


नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. याआधी नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल, असा दावा करण्यात आला होता. हा दावा शरद पवारांनी खोडला आहे.


ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल म्हणाले होते की, शरद पवार यांनी नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत.

Comments
Add Comment