Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीDhiraj Sahu black money : 'कहां से लोग इतना काला धन जमा...

Dhiraj Sahu black money : ‘कहां से लोग इतना काला धन जमा कर लेते है?’ धीरज साहूंचं जुनं ट्विट व्हायरल

आता स्वतःकडेच सापडले ३५१ कोटी; अजूनही पैशांची मोजणी सुरुच

मुंबई : काँग्रेसचे (Congress) राज्यसभेतले खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने (Income Tax Department) धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून आयकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्या कार्यालयातील कपाटात ठासून भरलेले नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावून गेले. धीरज साहू यांनी नोटांचे असंख्य बंडल कपाटांमध्ये ठासून भरले होते. या छापेमारीत आतापर्यंत ३५० कोटी रुपयांहून अधिक रोकड आयकर विभागाच्या हाती लागली आहे.

या पार्श्वभूमीवर धीरज साहू यांचं एक जुनं ट्वीट (Tweet) व्हायरल झालं आहे. या ट्विटमुळे काँग्रेसची बोलती बंद होणार आहे. हे ट्वीट त्यांनी २०२२ मध्ये १२ ऑगस्ट रोजी केलं होतं. त्यात ते म्हणतात, ‘नोटबंदीनंतरही देशात एवढा काळा पैसा (Black Money) आणि भ्रष्टाचार (Corruption) आहे की ते बघून मन व्यथित होतं. लोक एवढा पैसा नेमका आणतात कुठून, हे माझ्या लक्षातच येत नाही. या देशामध्ये जर कोणी भ्रष्टाचाराला आळा घालणार असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे’. असं ट्वीट साहू यांनी केलं होतं. मात्र आता त्यांच्याकडेच काळा पैसा सापडल्याने ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या ओडिशा येथील डिस्टिलरी कंपनीविरोधात आयकर विभागाने मोहीम उघडली आहे. साहू यांचं घर आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर मागील पाच दिवसांपासून तपास सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ३५१ कोटी रुपये अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही रक्कम मोजता मोजता पैसे मोजणारी मशीनच थकून बंद पडली. तरीही नवीन मशीन्स मागवण्यात आल्या असून पैशांची मोजणी सुरुच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -