Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीBox Office Collection: रणबीरच्या Animalने १० व्या दिवशी रचला इतिहास

Box Office Collection: रणबीरच्या Animalने १० व्या दिवशी रचला इतिहास

मुंबई: रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अॅनिमल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गरजत आहे. या सिनेमाची १० दिवसानंतरही क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमागृहे प्रेक्षकांनी खचाखच भरलेली दिसत आहेत. अशातच हा सिनेमा दररोज नवनवे रेकॉर्ड तोडत आहे. सोबतच बॉक्स ऑफिस कलेक्शनही जबरदस्त करत आहे.

रिलीजच्या १०व्या दिवशी केली इतकी कमाई

अॅक्शन, क्राईम, इंटिमेशन आणि रोमान्स यांनी फुल एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच रिलीजच्या १० दिवसानंतरही याची क्रेझ काही कमी झालेली नाही. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ३३७.५८ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी केली.

या सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी २२.९५ कोटी रूपये कमावले तर दुसऱ्या शनिवारी या सिनेमाने ५१.३७ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार या सिनेमाने रिलीजच्या १०व्या दवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ३७ कोटी कमावले. यासोबतच रिलीजच्या १० दिवसांची कमाई आता ४२७ कोटी इतकी झाली आहे.

१०व्या दिवशी दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

अॅनिमल हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर १०व्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली. यासोबतच हा सिनेमा १०व्या दिवशी सर्वाधिक कमावणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने १०व्या दिवसाच्या कमाईत सर्वांना मागे टाकले.

अॅनिमल हा सिनेमा संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -