मुंबई : अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ आणि ‘ज्युबिली’ या वेब सिरीजमधील उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित २३व्या आयटीए अवॉर्ड्समध्ये लोकप्रिय अभिनेत्री पुरस्कार प्राप्त केला. तिच्या अष्टपैलुत्व आणि आकर्षक अभिनयासाठी हा खास पुरस्कार तिने जिंकला असून प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध करून दाखवलं आहे.
‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’मधील भावपूर्ण अनारकलीचे अदितीचे पात्र तिने उत्तम साकारल तिचे भावनिक अभिव्यक्ती आणि सुंदर अभिनय कायम प्रेक्षकांना भावून गेला. ‘ज्युबिली’मध्ये ४०च्या दशकातील सुपरस्टार सुमित्रा कुमारी म्हणून आदितीने आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली आणि सुमित्रा कुमारीची भूमिका आपलीशी केली. अदिती सहजतेने भावपूर्ण नृत्यांगना पासून सुमित्रा कुमारीच्या करिष्माई आणि शक्तिशाली व्यक्तिमत्वात बदलते विविध भूमिकांवर तिची कमांड दाखवते.
वेब सीरिजच्या जगात एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने तिची बाजू पक्की केली आहे. प्रेक्षक तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत असून ज्यात विजय सेतुपतीसोबतचा मूक चित्रपट “गांधी टॉक्स” आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत “हीरामंडी” या वेब सिरीजचा समावेश आहे. पहिला इंडो-ब्रिटिश सहयोगी चित्रपट “लायनेस” मध्ये ती दिसणार आहे.