Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पुण्यातील पर्यटकाचा दापोलीच्या कर्दै समुद्रात बुडून मृत्यू

पुण्यातील पर्यटकाचा दापोलीच्या कर्दै समुद्रात बुडून मृत्यू

दापोली : पुणे परिसरातील चार मित्र दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास दापोली तालुक्यातील कर्दै सागर किनारी ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दशरथ यादव असे आहे. ते पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेले दशरथ यादव हे अविवाहित तरुण होते. त्यांच्या या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना कळविण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक पुणे येथून दापोली येथे दाखल झाल्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >