Monday, January 13, 2025
Homeताज्या घडामोडीभाड्याने घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या २ संशयितांस ४ वाहनांसह बेड्या

भाड्याने घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या २ संशयितांस ४ वाहनांसह बेड्या

भद्रकाली पोलिसांची कारवाई, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

नाशिक : चार चाकी वाहने भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करून फसवणाऱ्या टोळीचा म्होरक्या भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याकडून ४ चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

सप्टेंबर २०२२ मधील एका गुन्ह्याचा तपास करतांना या संशयितांचे धागेदोरे मिळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान डिसेंबर २०२० मधील एका गुन्ह्यातील संशयिताच्या मुसक्या बांधण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास खडकाळी परिसरातील फिर्यादीच्या ओळखीतील शादाब रहिम शेख, याने फिर्यादीला विश्वासात घेऊन मुंबईला जाण्यासाठी त्याची मारुती सुझुकी स्विफ्ट कार नेली. ही कार त्या संशयिताने मूळ मालकाला परत केली नाही म्हणून तब्बल एक वर्षानंतर म्हणजे २२ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित मालकाने भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

भद्रकाली पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे शादाब अब्दुल रहिम शेख, वय-३४ वर्षे, रा. ए ब्लॉक, फ्लॅट नं.०३, मनोहर मार्केट, सारडा सर्कल, नाशिक, सध्या रा. रूम नं.३०४, बिल्डींग नं.०२, एच. पी. वाशीनाका, म्हाडा कॉलनी, चेंबुर, मुंबई-७१ यास तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले. अहिरे आणि पो. शि. सूरज पगारे यांनी शादाब अब्दुल रहिम शेख याच्याकडे कसून चौकशी केली असता या गुन्हयातील स्विफ्ट डिझायर गाडी ही अकोला येथे विक्री केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर सपोनि अहिरे व गुन्हे शोध पथकाने सदरची गाडी ताब्यात घेतली.

शादाब अब्दुल रहिम शेख याचेकडे आणखी चौकशी केली असता त्याने नाशिक येथील ह्युंडाई कंपनीची वेर्ना गाडी व महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ या दोन गाड्या अनुक्रमे भगूर, नाशिक व मुंबई येथे विक्री केली असल्याचे सांगितल्याने पुन्हा सपोनि अहिरे व त्यांचेसोबत पोउनि राम शिंदे, पोउनि दिपक पटारे, पो.अं. सूरज पगारे यांचे पथकाने या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या.

एकूण तीन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली असून आणखी वाहने त्याचेकडून ताब्यात घेवून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तसेच हाजी चिरागोधीन काजी शेख रा. काजी पुरा, जुने नाशिक यांची महिंद्रा पिकअप, फोर्ब्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर, टाटा कंपनीची व्हिस्टा ही तिन्ही वाहने मुस्कान ट्रॅव्हल्स वाहन विक्री केंद्र काजीपुरा व द्वारका येथे डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत खालिद हनिफ शाह तांबापुरा जळगाव, अमोल बापू चव्हाण रा. इंदिरानगर गोंदेगांव ता. सोयगांव, जि. छत्रपती संभाजीनगर, अमोल वालचंद बिंबे रा. पाळणाघर जवळ, व्दारकानगर, बुलडाणा,विवेक उल्हास पाटील, डिव्हीजनल मॅनेजर, श्रीराम सिटी युनियन फायनान्स, शाखा जळगाव यांना विक्री करण्यासाठी विश्वासाने सोपविली असता त्यांनी संगनमत करून सदर वाहनांची परस्पर विक्री करुन वाहनांचा अपहार केला म्हणून भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर येथे गु.र.नं. २५४/२०२३ भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे दिनांक २०/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकात सपकाळे यांनी संशयित अमोल वालचंद बिंबे रा. पाळणाघर जवळ, व्दारकानगर, बुलडाणा याचा शोध घेवून त्यास अटक केली. अमोल वालचंद बिंबे याचेकडे विचारपुस करुन गुन्हयातील फोर्ब्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ताब्यात घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सपोनि/शिवाजी अहिरे, सपोनि/चंद्रकांत सपकाळे, पोउनि राम शिंदे, पोउनि दिपक पटारे, पो. अं./२३५२ सूरज पगारे, पो. अं./१३२६ किरण निकम तसेच गुन्हे शोध पथकाचे पोहवा/१८१६ संदिप शेळके, पोअं/१५७७ सागर निकुंभ, यांनी ही कामगिरी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -