Saturday, July 20, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्य, १० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३

साप्ताहिक राशिभविष्य, १० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३

साप्ताहिक राशिभविष्य, १० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३

अनेक अडचणी दूर होतील
मेष:
आजूबाजूच्या परिस्थितीतून आपल्याला अनुकूलता जाणवेल. लहान-मोठी रोजची कामे सहजी होत असल्याकारणाने आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र जास्त जोखीम भरलेली कामे पूर्ण करताना खबरदारी अवश्य घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे नुकसानकारक होऊ शकते. नोकरीमध्ये मुत्सद्दीपणाने वागण्याची गरज आहे. राजकारणापासून तसेच गटबाजीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. तुमच्या बोलल्यामुळे अनेक अडचणी दूर होतील. आपल्या मताला प्राधान्य मिळून आपण इतरांवर प्रभाव टाकाल. कौटुंबिक परिस्थिती चांगली राहून मानसिकता उत्तम राहील. आरोग्य चांगले राहील. आर्थिक आघाडीवर यश संपादित करू शकाल.
प्रगती व उन्नती होईल
वृषभ:

शुभ ग्रहमानामुळे अनुकूलतेने मध्ये भरच पडेल. आर्थिक आवक चांगली राहून सदरील काळात आपली प्रगती व उन्नती होईल. मानसिकता प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराची साथ विशेष करून मिळेल कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सोडून भाग्योदय होईल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील शुभवार्ता समजतील. अनेक कामे एकापाठोपाठ एक करून मार्गी लागतील. पूर्वी झालेले गैरसमज दूर करण्यात यशस्वी होऊ शकाल. सकारात्मक विचारांमध्ये वाढ होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. सहकुटुंब सहपरिवार लहान-मोठ्या अंतराचे प्रवास करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. नवीन खरेदी कराल. समाजातील मान्यवरांचा सहवास तसेच मार्गदर्शन लाभेल.
शुभ घटना घडतील
मिथुन:
गेल्या काही दिवसांमध्ये ज्या तब्येतीच्या कुरबुरी होत्या, त्या संपुष्टात येतील. त्यामुळे उत्साहात वाढ होईल तसेच अनेक चांगल्या आणि शुभ घटना घडून येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा प्रवास करावा लागेल. पर्यटन आणि देवदर्शनाच्या निमित्ताने हे प्रवास होतील. नोकरीमध्ये परिस्थिती चांगली राहील. प्रगती झालेली दिसेल. काहींना पदोन्नती, तर काहींची बदलीदेखील होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल होईल. अधिकार वाढतील. मुलांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्याने समाधानी राहाल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. नवीन खरेदी करू शकाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.
कार्यमग्न राहाल
कर्क:

निरनिराळ्या मार्गांनी अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्तेची कामे मार्गी लागून आर्थिक आवक होईल. कार्यमग्न राहाल. मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. नातेवाइकांच्या संपर्कात याल. मात्र वाद टाळणे हिताचे ठरेल. घरात आनंदी वातावरण कसे राहील, या प्रयत्नात असाल. मनात एक अनामिक भीती घर करून राहू शकते. नोकरी-व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. मात्र सरकारी कामात विलंब लागू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होऊन प्रवासाचे बेत आखले जातील. भौतिक सुखसोयी वाढविण्यासाठी खर्च कराल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
धनप्राप्तीचे प्रभावी योग
सिंह:
आत्तापर्यंत जी रखडलेली कार्य होती, ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. काही कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. तसेच या सप्ताहात धनप्राप्तीचे प्रभावी योग आहेत. अनेक अनेक मार्गांनी धनलाभ होतील. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायात नवीन संकल्पना राबवू शकाल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लाभ होतील. वारसाहक्काची कामे होतील. भावंड आणि नातेवाईक यांच्यातील गैरसमज दूर होतील. चांगले संबंध प्रस्थापित होतील. मित्रमंडळी भेटतील. जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. मात्र नेहमीपेक्षा थोडे जास्त काम करावे लागेल.
नियोजन यशस्वी होईल
कन्या:

बहुतेक क्षेत्रातील नियोजन यशस्वी झाल्याने ताणतणावमुक्त वातावरणाचा लाभ मिळेल. मनासारख्या घटना घडतील. जी महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची वाट बघत होतात, ती होऊ शकतात. महत्त्वाचे निरोप येतील. तरुण-तरुणींचे विवाहामधील अडचणी दूर होतील. कुटुंबातील मुला-मुलींचे प्रश्न संपुष्टात येतील. शैक्षणिक प्रगती होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. अवघड कामे पूर्ण होतील, त्यामुळे डोक्यावरचे ओझे उतरेल. मात्र जमिनीच्या व्यवहारात सतर्क राहण्याची आवश्यकता, फसवणूक होऊ शकते. नोकरीत सर्वांचे सहकार्य लाभेल.
आनंदी आणि प्रसन्न राहाल
तूळ :
मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी आणि प्रसन्न राहाल. धनप्राप्तीचे योग आहेत. काही अडकलेले पैसे मिळतील. व्यवसाय, धंद्यात भरभराट होईल. नोकरीत आपल्या कामामुळे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील. धार्मिक कार्यक्रमांत भाग घ्याल. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळू शकते. अनुकूल प्रतिसाद मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कार्यात अनपेक्षित अडचणी निर्माण होण्याची शक्यता. कोर्टकचेरीच्या कामांना विलंब होईल, संयम ठेवणे गरजेचे. प्रवासात सावधानता बाळगा. वाहनाच्या देखभालीकडे लक्ष द्या. कौटुंबिक सुख मिळेल.
प्रयत्न कमी पडू देऊ नका

वृश्चिक:
सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. स्वतः खर्च कराल तसेच सहपरिवार एखाद्या पवित्र धार्मिक स्थळी भेट द्याल. दानधर्माकडे कल राहील. पूजापाठ करण्यात मन रमेल. लोकांना मदत कराल. मालमत्तेच्या अथवा जमिनीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद मिटतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पैशाचा ओघ राहील. नोकरीत सहकारी, वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आपल्या आवडत्या कलेसाठी किंवा छंदासाठी वेळ तसेच पैसा खर्च करू शकाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मात्र प्रयत्न कमी पडू देऊ नका. यश मिळेल.

जीवनसाथीची साथ मिळेल
धनु:
कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. एखादे धार्मिक किंवा मंगलकार्याचे आयोजन होऊ शकते गृहसौख्य चांगले राहील. घरातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. जीवनसाथीची साथ मिळेल तसेच मदतही मिळेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढेल. मात्र संबंधितांशी मधुर संभाषण करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहून ताणतणाव संपुष्टात येऊ शकतो. वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे बेत निश्चित कराल.
जमिनीच्या कामात यश
मकर:

पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे कामे पूर्ण होत असलेली बघून आत्मविश्वासात वाढ होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळून कामे पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. स्थावर मालमत्ता अथवा जमिनीच्या कामात यश लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कामांमधील शिस्त पाळण्याची आवश्यकता तसेच आपले कामांमधील ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे ठरेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. काही वेळेस अचानक खर्चाच्या बाबी पुढे आल्यामुळे खर्च करावा लागेल.

प्रलोभनांपासून दूर राहा
कुंभ:

आत्तापर्यंत जे जातक नोकरीच्या शोधात होते. अशा जातकांचा नोकरीविषयक प्रश्न अथवा समस्या सुटून नोकरी मिळेल. रोजगार उपलब्ध होईल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी ठरून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. तसेच कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी मिळाल्याने आनंदी राहाल. चालू नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते तसेच स्थानबदल सुद्धा घडू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील. सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो. मात्र आपल्या अधिकारांच्या कार्यकक्षेत कार्य पूर्ण करा, ते हिताचे ठरेल. प्रलोभनांपासून दूर राहा. आर्थिक आवक चांगली राहील.
सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल
मीन:
सहकुटुंब अथवा मित्रमंडळींसह लहान तसेच दूरच्या अंतराचे प्रवास करू शकाल. मात्र प्रवासात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. देवदर्शन घडेल. सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल अथवा व्यवसाय विस्तार करता येईल. नोकरीत परिस्थिती सर्वसामान्य राहील. अपेक्षित कामे होतील. आर्थिक चिंता कमी होईल. काही वेळेस आपले अंदाज चुकू शकतात. घरात आनंदी वातावरण राहून मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीबाबत वार्ता कानी आल्यामुळे समाधानी राहाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -