Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडी

कुठे आणि किती पैसे उडवले हे लपवायचंय? कशी डिलीट कराल Gpay वरील Transaction history?

कुठे आणि किती पैसे उडवले हे लपवायचंय? कशी डिलीट कराल Gpay वरील Transaction history?

जाणून घ्या ही सोपी पद्धत


आजकाल ऑनलाईन पेमेंट (Online Payment) भारतामध्ये अत्यंत सोयीचं झालं आहे. अगदी पाच रुपयांपासून ते मोठ्या किंमतीचे व्यवहार ऑनलाईन सहज करता येतात. पण याचा लेखाजोखा आपल्याला पेमेंट अ‍ॅपच्या ट्रान्झॅक्शन हिस्टरीमध्ये (Transaction History) दिसतो. खरं तर आपण किती आणि कुठे पैसा खर्च केला याचा हिशेब ठेवण्यासाठी ही उत्तम सुविधा आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष पैशांद्वारे व्यवहार करतो तेव्हा खर्च लक्षात ठेवणं कठीण होतं. पण जर आपल्याला आपला खर्च इतरांना कळू द्यायचा नसेल तर मात्र समस्या निर्माण होते. त्यामुळे गुगल पे (Google Pay) वरील ट्रान्झॅक्शन हिस्टरी डिलीट कशी करावी याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.


गुगल पे भारतातील लोकप्रिय UPI पेमेंट अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरुन पुढील स्टेप्स वापरुन ट्रान्झॅक्शन हिस्टरी डिलीट करता येईल : -




  • सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये Google Pay अ‍ॅप ओपन करा

  • त्यानंतर टॉप कॉर्नरवरील प्रोफाईल (Profile) आयकॉनवर क्लिक करा.

  • प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर स्क्रोल करून खाली या आणि Settings वर क्लिक करा.

  • सेटिंग्स मध्ये जाऊन Privacy and Security वर जा.

  • इथे तुम्हाला Data and Personalization चा ऑप्शन दिसेल.

  • Data and Personalization ऑप्शनमध्ये Google Account वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला खाली Delete ऑप्शन दिसेल.

  • त्यानंतर तुम्हाला इथे एकामागून एक तुमचे गुगल पे ट्रान्झॅक्शन दिसतील, जे तुम्ही डिलीट करू शकता.


जर तुम्हाला एकत्र सर्व ट्रान्झॅक्शन हिस्टरी डिलीट करायची असेल तर तुम्ही Delete ऑप्शनवर जाऊन एकत्र सर्व ट्रान्झॅक्शन डिलीट करू शकता. तसंच एखादं ठराविक ट्रान्झॅक्शन डिलीट करण्यासाठी तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनवर क्लिक करून ते डिलीट करावं लागेल.

Comments
Add Comment