Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : ...तर गाठ या मराठ्यांशी आहे!

Nitesh Rane : …तर गाठ या मराठ्यांशी आहे!

फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडेबोल

मुंबई : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) देण्याची प्रक्रिया करत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) दौरे करत राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. पण हे करत असताना मराठा बांधवांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम ते करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वाटेल तसे आरोप ते करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ती कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय? तुमची भाषणं कोण लिहून देतंय? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय? याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढावी लागेल.

मराठा आरक्षणाबद्दल बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागतच करु पण ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या, त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -