मुंबई: भारतीय संघ(team india) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर(soutj africa tour) आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ३ टी-२० सामने, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्याची सुरूवात रविवारी १० डिसेंबरपासून होत आहे. या दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जात आहे.
मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाबद्दल जबरदस्त माहिती समोर आली आहे. त्यासाठी भारतीय संघाचा हा दौरा आर्थिक दृष्टया महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाला या मालिकेच्या सर्व ८ सामन्यांतून बंपर फायदा होणार आहे.
तीनही फॉरमॅटमध्ये वेगवेगळा कर्णधार
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा २९ दिवस असणार आहे. या दौऱ्यातून क्रिकेट दक्षिण आफ्रिका इतकी कमाई करणार आहे ज्यामुळे त्यांचा तोटा भरून काढू शकतील आणि यानंतरही पैसा वाचेल.
टी-२०मध्ये सूर्यकुमार यादव, वनडेत केएल राहुल आणि कसोटीत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरूवात १० डिसेंबरला टी-२० ला होईल आणि ३ ते ७ जानेवारीपर्यंत कसोटी सामने रंगतील.
दक्षिण आफ्रिकेला होणार इतका फायदा
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार भारतीय संघाच्या या दौऱ्यातून क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या तिजोरीत ६८.७ मिलियन डॉलर(साधारण५७३ कोटी रूपये) येण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचा तोटा भरून निघेल.
CSA ने सांगितले की गेल्या ३ वर्षादरम्यान एकूण २८.५ मिलियन डॉलर(साधारण २३७.७० कोटी रूपये) इतका तोटा सहन करावा लागला होता. अशातच भारतीय संघाच्या दौऱ्यातून हा तोटा भरून निघेल. तसेच येणाऱ्या वर्षांसाठी पुरेसा पैसाही मिळेल.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
टी-२० मालिका
१० डिसेंबर – पहिली टी-२०, डर्बन
१२ डिसेंबर – दुसरी टी-२० ग्केबरा
१४ डिसेंबर – तिसरी टी-२० जोहान्सबर्ग
वनडे मालिका
१७ डिसेंबर – पहिली वनडे, जोहान्सबर्ग
१९ डिसेंबर – दुसरी वनडे, ग्केबरा
२१ डिसेंबर – तिसरी वनडे, पार्ल
कसोटी मालिका
२६-३० डिसेंबर – पहिली कसोटी – सेंच्युरियन
३-७ जानेवारी – दुसरी कसोटी – केपटाऊन