Friday, October 17, 2025
Happy Diwali

IND vs SA: पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ, भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टी-२० रद्द

IND vs SA: पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ, भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टी-२० रद्द

डर्बन: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीडमध्ये खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळेच सुरूच होऊ शकला नाही. सतत पावसाचा व्यत्यय राहिल्याने सामन्यात टॉसही होऊ शकला नाही. अखेर वातावरण आणि मैदानाची स्थिती पाहता अंपायर्सनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होता. तर सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र आधीपासूनच पाऊस सुरू होता. यामुळे टॉसही होऊ सकला नाही. बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली. मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेईना यामुळे सामना अखेर रद्द करावा लागला.

निराश होऊन परतले प्रेक्षक

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना टॉस न होताच रद्द झाला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्व तिकीटे बुक झाली होती. मात्र पावसामुळे चाहत्यांना निराश होत घरी परतावे लागले.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडिया

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची टी-२० मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२०मध्ये सूर्यकुमार यादव नेतृत्व कऱणार आहे. तर वनडे मालिकेत केएल राहु आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व कऱणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >