मुंबई: तुमच्या नावाचे पहिले अक्षर आपल्या जीवनावर मोठा परिणाम करत असते. ज्या लोकांचे नाव B अक्षरापासून सुरू होते त्या लोकांचा नंबर असतो २. बी अक्षराचा स्वामी आहे चंद्र. चंद्राची एनर्जी क्रिएटिव्ह, विचारशील, संवेदनशील कलात्मक बनवते.
बी अक्षर असलेल्या व्यक्ती सुंदर असतात. दिसण्यास अतिशय स्मार्ट असतात. चंद्राची कला जशी रोज बदलत असते त्याप्रमाणे या लोकांचा मूड बदलत असतो. हे लोक खूप मूडी असतात. या व्यक्ती मनाने खूप चंचल असतात.
बी अक्षर असलेल्या व्यक्ती आपल्या जीवनात अनेकदा असे निर्णय घेतात ज्यामुळे त्यांना आपल्या जीवनात नुकसान सोसावे लागते. यामुळे यांना अनेकदा आपल्या आयुष्यात संकटाचा सामना करावा लागतो.
या व्यक्ती आपल्या कुटुंबाप्रती तसेच जवळच्या व्यक्तींबाबत अतिशय केअरिंग असतात. यांना अनेकजण आपली सिक्रेट्स सांगतात मात्र या कोणासोबतच काही शेअर करत नाहीत.
या व्यक्ती नेहमी हसमुख असतात. त्यांना जे मिळते त्यात हे खुश होतात. ते आपल्या कामावर फोकस करतात. जे काम हाती घेतात ते पूर्ण करूनच सोडतात.