Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीBollywood actors : बॉलिवूडचा किंग खान, खिलाडी आणि सिंघमला मिळाली केंद्र सरकारची...

Bollywood actors : बॉलिवूडचा किंग खान, खिलाडी आणि सिंघमला मिळाली केंद्र सरकारची नोटीस…

काय आहे प्रकरण?

मुंबई : शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgan) ही १९९० च्या दशकापासून आतापर्यंत सर्वाधिक चाहतेवर्ग असणारी बॉलिवूडची कलाकार मंडळी (Bollywood actors) आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करत असतात. त्यांचा कोणताही नवा चित्रपट आला की चित्रपटगृहात चाहत्यांची झुंबड उडते. पण या तीन कलाकारांना केंद्र सरकारकडून (Central Government) एक नोटीस मिळाली आहे, ही नोटीस नेमकी कशाबद्दल हे जाणून घेऊयात.

तिघेही कलाकार अनेक जाहिरातींमधून आपल्याला दिसत असतात. पण त्यांची नेहमीच चर्चेत राहणारी जाहिरात म्हणजे पान मसाल्याची जाहिरात (Pan Masala Ad). ही जाहिरात अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरली आहे. मोतीलाल यादव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका सादर केली होती. शाहरुख, अजय आणि अक्षय तिघांचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. तिघेही पद्म पुरस्काराने सम्मानित आहेत. या सम्मानित लोकांनी केलेल्या अशा जाहिरातींमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे असं याचिकाकर्ते मोतीलाल यादव यांचं म्हणणं आहे. कलाकारांच्या या वागण्यामुळे लोक चुकीच्या मार्गाला जातात असंही ते म्हणाले.

या प्रकरणात केंद्र सरकारच्या सुचनेनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ९ मे २०२४ पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान खंडपीठाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार, पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमारला नोटीस मिळाली आहे. मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. तरी त्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -