Saturday, June 14, 2025

पुण्याहून आलेले पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले! चार मुलींचा समावेश

पुण्याहून आलेले पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले! चार मुलींचा समावेश

देवगड : देवगड येथील समुद्र किनारी पोहण्यास उतरलेले पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी बुडाले. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे.


दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाचजण बुडू लागले. त्यावेळी आकाश तुपे त्यांना वाचविण्यास गेला. मात्र तोपर्यंत ते पाचजण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून एक बेपत्ता आहे. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.


मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >