Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : आदित्य ठाकरेंना अटक करून तपास करावा

Nitesh Rane : आदित्य ठाकरेंना अटक करून तपास करावा

आमदार नितेश राणे यांची मागणी

मुंबई : दिशा सालियन यांनी आत्महत्या केल्याचे कुणी बोलत आहे, तर कुणी अपघात म्हणत आहे, पण आम्ही ही हत्या असल्याचे म्हणत आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) अटक करून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल राणे यांनी केला.

भाजपाकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे विधान राऊत यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

आ. नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेचे ऑडिट कुणी करावे याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेने भाजपाला मतदानाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या २ खासदारांवरून ३०० वर पोहचली आहे. तर ठाकरे गटाची संख्या ५६ आमदारांवरून १५ वर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरचे महापौर ते आजपर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेने ऑडिट केले आहे, त्यामुळे आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही.

त्याचप्रमाणे हिंदुत्वाचे ऑडिट राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचे काय स्थान आहे? याचेही ऑडिट करा, असेही राणे म्हणाले. ज्या कुटुंबाचे पोट कोविड खिचडी घोटाळ्यावर भरते, त्याचे ऑडिट करावे. हॉटेल हयातचे बिल कोण भरते? याबद्दलही राणे यांनी ठाकरेंवर ताशेरे ओढले. बातम्यांमध्ये राहण्यासाठी संजय राऊत काहीही बोलत असतात. २०१० ला निलेश चव्हाणने आत्महत्या केली असे दाखविण्यात आले. या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या दबाबाखाली ही आत्महत्या केली. याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी राणे यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्यावर एका महिलेवर गँगरेप तसेच मर्डर केल्याचा आरोप आहे. इकडे तुम्ही ऑडिटची भाषा बोलता, असा सवालही त्यांनी केला.

राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र बसवून उबाठाची सगळी लफडी बाहेर काढीन, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची सफाई केली असून, त्यांनी अजून सफाई केली, तर काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -