Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५०००mAhबॅटरीसह Realmeचा आहे स्वस्त स्मार्टफोन

५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५०००mAhबॅटरीसह Realmeचा आहे स्वस्त स्मार्टफोन

नवी दिल्ली: Realme भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच करत आहे. हा हँडसेट १४ डिसेंबरला लाँच होणार आहे आणि या हँडसेटचे नाव Realme C67 5G असेल. हा एक परवडणारा स्मार्टफोन असेल. हा फोन १५ हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीला मिळू शकतो. कंपनीने एक्स सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवर याबाबतीत पोस्ट केली आहे तसेच लाँचिंग डेटही कन्फर्म केली आहे.

रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटवर एक टीझर पोस्टर समोर आला आहे यात लाँचिंग डेटसह फोनला दाखवण्यात आले आहे. या फोनचे नाव Realme C67 5G असेल. हा फोन c सीरिजचा भाग आहे. हा एक परवडणारा हँडसेट असेल. कंपनीने या सीरिजमध्ये आधी अनेक हँडसेट लाँच केले आहेत. अधिकृत टीझरवरून समजते की रिअलमीचा अपकमिंग फोन फ्लॅट स्क्रीनसोबत येईल.

Realme c सीरिजमध्ये अनेक परवडणारे स्मार्टफोन

Realme c सीरिजअंतर्गत कंपनीने अनेक किफायतशीर स्मार्टफोन लाँच केले आहेत. या वर्षी कंपनीने Realme cs3 भारतात लाँच केला होता. यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ८९९९ रूपयांपासूनच्या सुरूवाती किंमतीचा हा फोन १०८ एमपी कॅमेऱ्यासह येतो. कंपनीचा दावा आहे की हा १०८ एमपी कॅमेरा असलेला भारताचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

 

Realme C67 5Gचे फीचर्स

Realme C67 5G बद्दल अनेक लीक्स समोर आले आहे. यात फोनमध्ये विविध फीचर्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ५०एमपी प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तसेच यात ५०००mAh बॅटरी असू शकते. या हँडसेटची किंमत १२-१५ हजार रूपयांदरम्यान असू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -