नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यात विविध मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होत आहेत. यातच गुरूवारी सदनात एक असा प्रश्न उपस्थित झाला त्याचे उत्तर देताना रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांना म्हणावे लागले की ‘सॉरी हे आमच्या विभागाचे अपयश आहे’.
एक्सप्रेसवेवरील सातत्याने होणाऱ्या रस्ते अपघाताबाबतच्या एका प्रश्नावरून त्यांनी हे उत्तर दिले. सोबतच ते म्हणाले की लोकांनी रस्त्यावर चालताना सुरक्षेसंबंधी ट्र्रॅफिकचे नियम पाळावेत तेव्हाच अशा घटनांचे प्रमाण कमी होईल.
आम्ही अशा घटना रोखू शकलो नाही हे चिंताजक
लोकसभेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे कोटगिरी श्रीधर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे देशातील रस्ते अपघाताच्या घटना कमी होत नाही आहेत. गडकरी यांनी देशातील रस्ते अपघात आणि त्यातील लोकांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले त्यांच्या विभागाच्या सातत्याच्या प्रयत्नानंतरही रस्ते अपघात काही कमी होत नाही आहेत.
वेगाच्या मर्यादेत सूट देण्याची लोकांची मागणी
एक्सप्रेसवेवर एकीकडे काही लोक वेगाच्या मर्यादी वाढवण्याची मागणी करतात तर या संबंधातील कायद्यात सूट देण्याची मागणी करतात. तर काही लोक वेगमर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव देतात. एक्सप्रेसवेवर गाड्यांचा वेग कमीत कमी १०० किमी प्रति तासापेक्षा अधिक असतो. काहीजण १४० ते १६०च्या स्पीडने गाडी चालवतात.
सातत्याने होत आहेत रस्ते अपघात
दरवर्षी रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे. यावर नितीन गडकरी म्हणाले, २०२१मध्ये देशात ४ लाख १२ हजार ४३२ रस्ते अपघात झाले तर त्याच्या पुढील वर्षी ४ लाख ६१ हजार ३१२ अपघात झाले. यात १२ टक्के वाढ झाली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण २०२१मध्ये एक लाख ५३ हजार ९७२ होते ते वाढून २०२२मध्ये एक लाख ६८ हजार ४९१ झाले. यात १० टक्के वाढ झाली.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी लोकांनी नियम पाळावेत
सातत्याने होणारे रस्ते अपघात कमी करायचे असतील तर रस्ते नियम पाळणे गरजेचे आहे. लोकांनी रस्त्यांचे नियम पाळलेच पाहिजे. लहान लहान गो्ष्टी जसे गाड्यांचा वेग मर्यादित ठेवणे, ड्रायव्हिंग करताना फोनवर न बोलणे, यांची काळजी घेतल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात.