हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु
हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Former Telangana Chief Minister K Chandrashekar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्रीच्या सुमारास केसीआर (KCR) एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर बाथरुममध्ये पाय घसरुन पडले. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. सध्या त्यांच्यावर हैदराबादच्या (Hyderabad) यशोदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
Sri KCR Garu needs to undergo a Hip Replacement Surgery today after he had a fall in his bathroom
Thanks to all those who have been sending messages for his speedy recovery pic.twitter.com/PbLiucRUpi
— KTR (@KTRBRS) December 8, 2023
नुकतेच विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले, ज्यात तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री असणारे केसीआर यांचा पराभव झाला. काँग्रेसचा तेलंगणामध्ये विजय झाला असून रेवंथ रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे २०१३ पासून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांची मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक हुकली.