Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीJunior Mehmood: कॅन्सरशी लढा देणाऱ्या ज्युनियर महमूद यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Junior Mehmood: कॅन्सरशी लढा देणाऱ्या ज्युनियर महमूद यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेले ज्युनियम महमूद(junior mehmood) यांची कॅन्सरशी सुरू असलेली लढाई अखेर अयशस्वीरित्या संपली. त्यांना पोटाचा कॅन्सर होता. चौथ्या स्टेजचा हा कॅन्सर होता. त्यांच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज जुम्नाचा नमाज झाल्यानंतर जुहू येथील कब्रस्तनात ज्युनियर महमूद यांना सूपर्द ए खाक केले जाईल. निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, सुना आणि एक नातू आहेत. ज्युनियर महमूद साहेब यांचे खरे नाव नईम सय्यस असे होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ला झाला होता. काही दिवसांपूर्वीच ज्युनियर महमूद पोटाच्या कॅन्सरने पीडित असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर काही अभिनेत्यांनी त्यांची भेटही घेतली होती.

मास्टर राजू दररोज ज्युनियर महमूद यांची चौकशी करण्यासाठी जात. त्यांनीच आपल्या पोस्टच्या माध्यमातून ज्युनियर महमूद यांची तब्येत खराब झाल्याची माहिती जगाला दिली होती. अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत राजू यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, ज्युनियर महमूदजी यांना पोटाचा कॅन्सर झाला आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. यानंतर जॉनी लिव्हर त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते.

एकेकाळी प्रसिद्ध आर्टिस्ट राहिलेल्या ज्युनियर महमूद यांच्या पोटाच्या कॅन्सरच्या बातमीने अनेक सोशल मीडियावरील चाहते निराश झाले होते. ज्युनियर महमूद यांनी सुपरस्टार जितेंद्र आणि आपले लहानपणीचे मित्र सचिन पिळगावकर यांच्यासोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही अभिनेत्यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

कोण होते ज्युनियर महमूद?

ज्युनियर महमूद यांचे खरे नाव नईम सय्यद होते. सिनेसृष्टीत त्यांनी हे नाव ठेवले होते. ज्युनियर महमूद यांनी आपल्या बॉलिवूडमधील करिअरची सुरूवात एक चाईल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. यातून त्यांना सिनेमाद्वारे खास ओळख मिळाली. त्यांनी बचपन, गीत गाता चल, कटी पतंग, मेरा नाम जोकर, ब्रम्हचारी यासह अनेक सिनेमे केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -