Thursday, July 25, 2024
HomeदेशAditya-L1ने घेतला सूर्याचा पहिला फोटो, विविध रंगात पाहा आपला तारा

Aditya-L1ने घेतला सूर्याचा पहिला फोटो, विविध रंगात पाहा आपला तारा

नवी दिल्ली: आदित्य एल १ मोहिमेच्या यशाचा पहिला पुरावा सापडला आहे. या सॅटेलाईटच्या सोलार अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याचा पहिल्यांदा फिल डिस्क फोटो घेतला आहे. हे सर्व फोटो २०० ते ४०० नॅनोमीटर वेव्हलेंथचे आहेत. म्हणजेच सूर्य तुम्हाला ११ विविध रंगात दिसणार आहे.

Aditya-L1च्या SUIT पेलोडला २० नोव्हेंबर २०२३मध्ये ऑन करण्यात आले होते. या टेलिस्कोपने सूर्याचा फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयर फोटो घेतले आहेत. फोटोस्फेयर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग.

याआधी सूर्याचा फोटो ६ डिसेंबर २०२३ला घेम्यात आला होता. मात्र ती पहिली लाईट सायन्स इमेज होती. मात्र यावेळेस फुल डिस्क इमेज घेण्यात आली आहे. म्हणजेच सूर्याचा जो भाग पूर्णपणे समोर असतो त्याचा फोटो. या फोटोत सूर्याच्या पृष्ठभागावरील डाग, प्लेग आणि सूर्याचे शांत पडलले भाग दिसत आहे. या फोटोंच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास अधिक खोलवर करू शकतात.

या संस्थानांनी बनवले SUIT पेलोड

SUITला पुण्याच्या इंटर युनिर्व्हसिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, सेंटर फॉल एक्सलेंस इन स्पेस सायन्स इंडियन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्झरवेटरी, तेजपूर युनिर्व्हसिटी आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मिळून बनवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -