Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडी२०२३मधील हे आहेत सुपरफ्लॉप सिनेमे, निर्मात्यांचे बुडाले १००० कोटी

२०२३मधील हे आहेत सुपरफ्लॉप सिनेमे, निर्मात्यांचे बुडाले १००० कोटी

मुंबई: २०२३मध्ये बॉलिवूडमधील अनेक सिनेमे आले. त्यातील काही दमदार चालले. तर काहींनी पूर्ण जीवच टाकला. २०२३मध्ये शाहरूख खानच्या पठाण सिनेमाने दमदार कमाई केली. त्यानंतर सनी देओलच्या गदर २ आणि शाहरूख खानच्या जवान सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. सध्या रणबीर कपूरचा सिनेमा अॅनिलम सिनेमाही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र २०२३मध्ये ५ सिनेमे असे आले ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अजिबातच चालले नाही. या ५ सिनेमांनी निर्मात्यांना मोठा झटका दिला.

आदिपुरुष – दिग्दर्शक ओम राऊत यांचा सिनेमा आदिपुरुष हा मोठ्या धुमधडाक्यात समोर आला. प्रभास आणि कृती सॅनॉन स्टारर या सिनेमाकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. ६०० कोटी रूपयांचे बजेट या सिनेमाचे होते. मात्र हा सिनेमा ३०० कोटींचीच कमाई करू शकला. आदिपुरूष सिनेमामुळे ३०० कोटी रूपयांहून झटका बसला.

तेजस – कंगना राणावत स्टारर सिनेमा तेजस सर्वेश मेवाडाने दिग्दर्शित केला होता. या सिनेमात कंगना राणावतने मुख्य भूमिका साकारली होती. ७० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बसलेल्या सिनेमाला लोकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. या सिनेमाला केवळ ४.२५ कोटी रूपये कमाई करता आली.

मिशन राणीगंज – अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज हा सिनेमा ६ ऑक्टोबरला सिनेमाघरांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाबाबत अक्षय कुमार खूप उत्साहित होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरदार आपटला. या सिनेमाचे बजेच ७० कोटी रूपये होते. मात्र हा सिनेमा १८ कोटींचीच कमाई करू शकला.

शहझादा – बॉलिवूडचा दिग्गज डायरेक्टर डेविड धवनने या वर्षाची सुरूवात शहझादा सिनेमाने केली. या सिनेमाचे बजेट ५० कोटींपेक्षा जास्त होते. मात्र या सिनेमाने भारतात केवळ ३२ कोटी रूपयांचे कलेक्शन केले. २०२३च्या सुपरफ्लॉप सिनेमांच्या यादीत या सिनेमाचे नाव होते.

गणपथ – टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन स्टारर सिनेमा गणपथ रिलीज झाला. डायरेक्टर विकास बहल यांचा हा सिनेमा १५० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनला होता. १५० कोटी रूपयांच्या सिनेमाने केवळ १८ कोटी रूपयांची कमाई केली. या सिनेमाने निर्मात्याला १३० कोटींचे नुकसान भोगावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -