Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीShare Market: कशी करावी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक?

Share Market: कशी करावी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक?

गेल्या काही दशकापासुन शेअर मार्केट हा विषय पैसा कमावण्यासाठी एक आकर्षणाचा विषय ठरला आहे. एखाद्या देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होत असताना त्या देशात येणारी गुंतवणूक ही शेअर मार्केट वरती अवलंबून असते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर पाहुया…

शेअर मार्केट म्हणजे काय?
शेअर म्हणजे एखाद्या कंपनीचा काही हिस्सा किंवा काही भाग. उदा. एखाद्या कंपनीकडे शंभर शेअर आहेत आणि त्यातले 60 शेअर तुमच्याकडे आहेत तर तुम्ही त्या कंपनीचे साठ टक्के मालक होतात. मार्केट म्हणजे जिथे खरेदी व विक्री होते. शेअर मार्केट हे याच दोन शब्दापासून बनले आहे. शेअर मार्केट ही एक अशी व्यवस्था आहे की जिथे कंपनीच्या शेअरची खरेदी व विक्री होते, ही पूर्ण प्रक्रिया स्टॉक एक्सचेंज द्वारे होत असते .सध्या भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (मुंबई स्टॉक एक्सचेंज) (BSE),आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज( NSE) हे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत. या सर्व स्टॉक एक्सचेंज वरती सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारा नियंत्रण ठेवले जाते.

सेन्सेक्स म्हणजे काय:                                                                                                          मुंबई शेअर बाजार( BSE )च्या निर्देशांकला सेन्सेक्स असे म्हणतात. सेन्सेक्स ची हालचाल ही मुंबई शेअर बाजारामध्ये नोंद असणाऱ्या कंपन्यापैकी सर्वात जास्त भांडवली मूल्य असणाऱ्या 30 कंपनीच्या शेअर हालचाली वरती अवलंबून असते.

निफ्टी फिफ्टी म्हणजे काय:
राष्ट्रीय शेअर बाजार हा मुंबई शेअर बाजार नंतर दुसरा सर्वात मोठा शहर बाजार आहे ,NSE निर्देशांकाला निफ्टी-फिफ्टी असे म्हणतात .निफ्टी-फिफ्टी हा निर्देशांक NSE मध्ये असलेल्या पूर्ण 22 क्षेत्रातील सर्वात जास्त भांडवली मूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या मूल्यावरून काढला जातो.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी:

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या ब्रोकरची गरज असते . ब्रोकरच्या साह्याने आपण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी असलेले पर्याय:
1. प्राथमिक गुंतवणूक किंवा आयपीओ IPO द्वारे केली जाणारी गुंतवणूक:एखाद्या खाजगी कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते तेव्हा त्या कंपन्या IPO द्वारे आपल्या कंपनीचे शेअर विकून पैसा एकत्र करत असतात.

2. द्वितीय गुंतवणूक: IPO मध्ये वाटप झालेल्या शेअरमध्ये खरेदी व विक्री सुरू होते .खरेदी व विक्री केली जाणारे शेअर हे कंपनी कर्मचारी किंवा आयपीओद्वारे वाटप झालेले शेअर होल्डर यांचे असतात.

3. म्युच्युअल फंड द्वारे केली जाणारी गुंतवणूक: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना कंपनीचे मूलभूत विश्लेषण करणे गरजेचे असते. म्युच्युअल फंड कंपनीकडे मूलभूत विश्लेषण करण्यासाठी अनेक तज्ञ लोक असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड द्वारे केली जाणारी गुंतवणूक ही कमी जोखीम असते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट ची गरज असते ,शेअर मार्केटमध्ये आयपीओ द्वारे, एक्विटी मार्केट मधून शेअर खरेदी करून किंवा म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणूक करता येते. यासाठी बाजारात नवनवीन ॲपदेखील उपलब्ध आहेत. या  ॲपद्वारे आपण मोफत डिमॅट अकाउंट उघडु शकतो. या  ॲप्सचा उपयोग करुन आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -