मुंबई: मोहम्मद शमीला(Mohammad shami) नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. आयसीसीने प्लेयर ऑफ दी मंथ अॅवॉर्डसाठी मोहम्मद शमी व्यक्तिरिक्त आणखी दोन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्सना नॉमिनेट करण्यात आले आहे. हे खेळाडू आहेत ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल.
आयसीसीने ७ नोव्हेंबरला प्लेयर ऑफ दी मंथ अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर केले. आयसीसीच्या माहितीनुसार मोहम्मद शमी, ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेलने नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी केली. शमी, हेड आणि मॅक्सवेलने कौतुक करण्याजोगी कामगिरी केली.
मोहम्मद शमीची विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत नोव्हेंबर महिन्यात केवळ १२.०६च्या सरासरीने ६ विकेट मिळवल्या. त्याचा इकॉनॉमी रेट ५.६८ इतका होता. जर विश्वचषकाच्या सगळ्या सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास त्याने एकूण २४ विकेट मिळवल्या. त्याची न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी राहिली. शमीने न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट मिळवल्या होत्या.
ट्रेविस हेडबाबत बोलायचे झाल्यास क्रिकेटचाहते विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्याने ठोकलेले शतक विसरूच शकत नाही.त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात १३७ धावा कुटल्या होत्या. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ६२ धावांची महत्त्वाची खेळी केली होती.
ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या दुहेरी शतकामुळे नॉमिनेट करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या या ऑलराऊंडरने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी केली होती. यासोबतच मॅक्सवेल जगातील पहिला फलंदाज ठरला ज्याने वनडेच्या दुसऱ्या डावात दुहेरी शतक ठोकले.