हिवाळा म्हटलं की अगदी सर्वांच्या आवडीचा ऋतू. पण थंडीचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. थंडीने त्वचा कोरडी पडते आणि या कोरडेपणामुळे बाह्यत्वचेवर परिणाम होऊन ते आकुंचन पावतं. स्क्रीन सेल्स तुटण्यास सुरुवात होते. त्वचेवर हा परिणाम काही दिवसांनंतर दिसायला लागतो. साबण अथवा फेसवॉशने त्वचा कोरडी पडते, असाही समज आहे. त्यात तथ्य आहे. कारण साबण किंवा फेसवॉशने चेहरा धुतल्यास कोरडा पडतो. त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते. म्हणून चेहरा फक्त पाण्याने धुवावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फेसवॉश वापरावा.
१. रात्री झोपताना आपला चेहरा झाकून झोपणे.
२. सकाळी लवकर उठत असाल तर तोंडाला कपड़ा बांधणे.
३. अंघोळ नेहमी गरम पाण्याने करावी.
४. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये बसावे.
५. अंघोळ करताना साबणाचा उपयोग कमी करणे.
६. अंघोळ करताना त्वचा जास्त प्रमाणात घासु नये.
७. त्वचा कोरडी पडली असेल तर त्या जागेवर थोड़े तेल लावावे.
८. कमीत कमी २ ते ३ लीटर पाणी दररोज प्या.
हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.
१. दररोज १ तास व्यायाम करावा.
२. दररोज योग करावा.
३. दररोज सूर्यनमस्कार करावेत.
४. जेवण वेळेवर करावे.
५. जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश असावा.
६. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारावा.
हिवाळ्यात केसांची निगा राखणं हा देखील एक जटील प्रश्न असतो. हिवाळ्यात केस कोरडे होऊन त्यांची मुळं कमकुवत बनतात. म्हणून केस कोमट पाण्यानेच धुवावे. त्यामुळे त्यांची मुळं तुटत नाहीत. हिवाळ्यात केस गळतीही होते. ती मर्यादेबाहेर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केसातील कोंडा हेदेखील मुख्य कारण असू शकतं. हिवाळ्यात डोक्याची त्वचा कोरडी होते. हलक्या हातानं तेलाचा मसाज केल्यास डोक्याच्या त्वचेला मॉइश्चर मिळून रक्ताभिसरणदेखील सुधारतं. हिवाळ्यात मॉइश्चर असलेल्या शॅम्पूसोबत कंडिशनरदेखील वापरावा. तसेच ‘हेअर ड्रायर’चा वापर टाळावा.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…