Tuesday, April 29, 2025

महामुंबईदेशताज्या घडामोडी

Heart attack: देव तारी त्याला कोण मारी? ५ वेळा हार्ट ॲटॅक येऊनही ‘ती’ जिवंत

Heart attack: देव तारी त्याला कोण मारी? ५ वेळा हार्ट ॲटॅक येऊनही ‘ती’ जिवंत

मुंबई (वृत्तसंस्था) : हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट ॲटॅक येणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय घाबरवणारे असते. पण मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका ५१ वर्षांच्या महिलेला गेल्या १६ महिन्यांमध्ये तब्बल ५ वेळा हार्ट ॲटॅक आला आहे. सुनीता (नाव बदललं आहे) यांना पाच स्टेंट लावण्यात आले असून आत्तापर्यंत सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. एक बायपास सर्जरीही झाली आहे.

१ आणि २ डिसेंबरदरम्यान त्यांना शेवटचा हार्ट ॲटॅक आला. मला नक्की काय झाले आहे. ज्यामुळे वारंवार या स्थितीचा सामना करावा लागत आहे. एवढाच प्रश्न सध्या त्यांच्या मनात घोळत आहे. तीन महिन्यात पुन्हा एखादे ब्लॉकेज डेव्हलप होईल का, हीच चिंता त्यांना सतावत असते.

१६ महिन्यांपूर्वी आला पहिला हार्ट ॲटॅक  जयपूरहून बोरिवलीला येत असताना सप्टेंबर २०२२ मध्ये सुनीता यांना ट्रेनमध्ये पहिल्यांदा हार्ट ॲटॅक आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना अहमदाबादच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. या वर्षी जुलै महिन्यापासून हृदयरोग विशेषज्ञ डॉ. हसमुख रावत यांच्याकडे सुनिता या उपचारांसाठी जात आहेत. तोपर्यंत त्यांच्या दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेली होती. त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्या कशामुळे उद्भवतात हे तर एक रहस्यच आहे. व्हॅस्क्युलिटीस सारखा एक ऑटो-इम्युन आजार, हा यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या ऑटो-इम्युन आजारामध्ये रक्तवाहिन्या सूजतात आणि अरुंद होतात. पण सुनीता यांच्याबाबतीत नेमके काय घडले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दर महिन्याला परत जाणवू लागतात : छातीत तीव्र वेदना, ढेकर येणे आणि बेचैन वाटणे यासारखी अनेक लक्षणे त्यांना दर काही महिन्यांनी जाणवू लागतात. सुनीत यांना फेब्रुवारी, मे, जुलै आणि डिसेंबरमध्ये हार्ट ॲटॅक आला. त्या आधीपासूनच मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि जाडेपणा यांसारख्या समस्यांचा सामना करत होत्याच. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांचं वजन १०७ किलो होते. पण तेव्हापासू आत्तापर्यंत त्यांचे वजन ३० किलोंहून अधिक कमी झाले. त्यांना ‘पीसीएसके ९ इनहिबिटर’ हे कोलेस्ट्रॉल कमी करणारे इंजेक्शन देण्यात आल्याने त्यांची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाली आणि मधुमेह देखील नियंत्रणात आहे. पण त्यांना अजूनही हार्ट ॲटॅक येतोच. पेशंट्समध्ये एकाच जागी वारंवार ब्लॉकेज होणे हे काही नवे नाही, पण सुनीता यांच्या केसमध्ये वारंवार, नव्या जागी ब्लॉकेजेस येत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

Comments
Add Comment