Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGod : ‘हवे’पणाला हवी काहीतरी मर्यादा...!

God : ‘हवे’पणाला हवी काहीतरी मर्यादा…!

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

परमेश्वर हा विषय आपल्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले सगळे जीवन जे आहे ते त्यांच्यावर अवलंबून आहे. परमेश्वर आपल्या जीवनाचे अधिष्ठान आहे, आपल्या जीवनाचा पाया आहे तसाच तो आपल्या जीवनाचे शिखर आहे. आपल्या जीवनाचे मूळही तोच व फळही तोच. या परमेश्वराचे अस्तित्व आपल्याला पावलोपावली, क्षणोक्षणी जाणवत असते. पण ते आपण जाणवून घेत नाही. तुम्ही म्हणाल आपण हे जाणवून का घेत नाही, तर याचे कारण एकच आहे, ते म्हणजे आपल्याला जाणवून घेण्याची इच्छा नसते. आपल्याला हवे व नको या दोन गोष्टी असतात. जाणवून घेण्याची इच्छाच नसल्याचे कारणही हेच की जे हवे वा नको यांत आपण अडकलेले असतो. हवे काय ते मिळवण्याचा प्रयत्न करतो व नको काय ते टाळण्याचा प्रयत्न करतो.

थोडक्यात सांगायचे म्हणजे हवे व नको या दोन गोष्टींमध्ये आपले जीवन चाललेले असते. बघा तुम्ही, सकाळी उठल्याबरोबर चहा केला पाहिजे. नवऱ्याला चहा हवा, आपल्याला स्वतःलाही चहा हवा. मग अंघोळ केली पाहिजे, मग जेवण केले पाहिजे. पाहिजे पाहिजे, हवे हवे असेच चालले असते. या “हवे”ला limit नसते. जशी आपल्या आसपासची हवा! जसे त्या हवेला limit नसते, तसे या “हवे”लाही limit नसते. हवे हवे म्हणताना ते मिळत गेले की आणखी पाहिजे, मिळत गेले की आणखी पाहिजे.

तुम्ही म्हणाल हे “हवे” नको का?, तर हवे. नाहीतर त्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही. मला आता काहीही नको असे म्हटले की जीवनच संपले. त्या जीवनाला काही अर्थच उरला नसल्याने तो काहीच करणार नाही. जोपर्यंत आपल्याला काहीतरी “हवे” आहे व काहीतरी “नको” आहे, तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ आहे. “हवे नको” वाईट नाही. पण या “हवे”पणाला काहीतरी मर्यादा पाहिजेत. पैसा पैसा करतात. पैसा हवाच, पैसा नको कोण म्हणेल? पैशाशिवाय एक पाऊलही टाकता येणार नाही. घरांत राहायचे, तरी पैसा पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स दिला नाही, भाडे भरले नाही, तर जागा खाली करावी लागेल. पैशाशिवाय एक पाऊलही टाकता येणार नाही हे सांगायला प्रवचन करायला नको.

पण पैसा किती हवा? Comforts of life मिळवण्याएवढा पैसा हवा. luxuries कडे जातो तेव्हा पंचाईत होते. आता गंमत अशी झालेली आहे की, Luxurious life ही Necessity झालेली आहे. ज्याला एकेकाळी Luxurious म्हणत होतो तेच आता Necessity झालेले आहे. मोटर ही आता Luxurious राहिलेली नाही, तर ती Necessity झालेली आहे. Telephone हा Luxurious राहिलेला नाही, तर Necessity आहे. मोबाइल हा Luxurious राहिलेला नाही, तर Necessity आहे. विमानाने जाणे येणे हे आता Necessity झालेले आहे, कारण वेळ वाचतो. आम्हाला गोव्यात गाडीने जाण्यासाठी १६-१७ तास लागतात, पण तेच विमानाने पाऊण तासात पोहोचतो. किती वेळ वाचला? आता या सगळ्या Necessity झाल्या आहेत, कारण आता लोकांना वेळेचे महत्त्व फार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -