नवी दिल्ली: तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रेवंत रेड्डी(revanth reddy) गुरूवारी तेलंगणाचे मुख्यमंक्षी म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा दुपारी १.०४ मिनिटांनी हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडिययमध्ये रंगेल. यात एक लाख लोक सामील होण्याची शक्यता आहे. व्हीआयपीशिवाय रेवंत रेड्डी यांनी सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सामील होण्याचे खुले निमंत्रण दिले आहे.
गुरुवारी होत असलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी सामन्य लोकांना पाठवण्यात आलेल्या खुल्या निमंत्रण पत्रिकेत रेवंत रेड्डी यांनी लिहिले की, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेलंगणामध्ये इंदिराम्मा राज्यम आणण्याची वेळ आली आहे. तसेच तेलंगणा जे विद्यार्थ्यांचा संघर्ष, शहीदांचे बलिदान आणि सोनिया गांधी यांच्या दृढ इच्छाशक्तीने बनले आहे. हे लोकशाहीमुख आणि पारदर्शी सरकार प्रदान करण्यासोतच कमकुवत वर्गा, दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार बनवण्यासाठी गुरूवारी दुपारी १.०४ मिनिटांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या रूपात शपथ घेतील. तुम्हाला सर्वांना यानिमित्ताने आमंत्रित केले जात आहे.
राजस्थानात मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम
एकीकडे तेलंगणामध्ये नवे मुख्यमंत्री शपथ घेतली तर दुसरीकडे राजस्थानात नव्या मुख्यमंत्रीचे नाव अद्याप ठरलेले नाही. बुधवारी दिवसभर यावर भाजपची चर्चा सुरू होती. रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली मात्र नावाची घोषणा झाली नाही.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशलाही प्रतीक्षा
राजस्थानप्रमाणेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही नव्या मुख्यमंत्र्याची प्रतीक्षा केली जात आहे. असे सांगितले जात आे की भाजपचे वरिष्ठ नेते आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची नावे फायनल करू शकतात.