Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीशेतात म्हैस घुसल्याने वाद, एका मुलाचा मृत्यू, अनेक जखमी

शेतात म्हैस घुसल्याने वाद, एका मुलाचा मृत्यू, अनेक जखमी

लखनऊ: उत्तर प्रदेशात(uttar pradesh) खुले फिरणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत आणि आपली शेतीची राखण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. ही जनावरे शेतात घुसल्यानंतक पिके उद्ध्वस्त कतात यातच गोंडा येथील एका शेतीत पाळीव प्राणी घुसल्याने वाद झाला. यात एका मुलाचा मृत्यू झाला. तर या घटनेत बरेच जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे.

या घटनेतील जखमींना गोंडा जिल्ह्याच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे प्रकरण गोंडाच्या कौडिया ठाणे परिसरातील चकई पुरवा गावात घेडले. यात शेतात म्हैस घुसल्याच्या प्रकरणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले. यांना उपचारासाठी गोंडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत १५ वर्षीय राजकुमार उर्फ निरहू याचा मृत्यू झाला आहे.

म्हैस शेतात गेल्याने झाला वाद

दोन्ही गटांकडून दिलेल्या माहितीच्या आधारावर कौडिया बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे. या मुलाचा मृतदेह ताह्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की मंगळवारी संजू म्हशीला बांधण्यासाठी नेत ोता. त्यावेळेस म्हैस जवळच्या शेतात घुसली यावरून शेतीच्या मालकाने त्याला बरेच काही सुनावले. यानंतर दोन्ही गटात लाठीने हाणामारी झाली. यात अर्ध्या डझनहून अधिक जण जखमी झाले.

एका मुलाचा मृत्यू, अनेक जण जखमी

या प्रकरणी कर्नलगंज सर्किल ऑफिसर चंद्र प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बगनाईच्या चकाई पुरावामध्ये पाळीव प्राण्याच्या शेतात घुसवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. यात दोन मुलांसह अनेक लोक जखमी झाले होते. दोन्ही मुलांना चांगल्या उपचाासाठी आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. येथे त्यांच्यवर उपचार सुरू होते. काही लोकांना लखनऊला पाठवण्यात आले. दरम्यान, उपचार घेत असताना यातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -