वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एकाच कुटुंबातील चार लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण गुरूवारी संध्याकाळी उशिरा समोर आले. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या कशामुळे केली याबाबतचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या कैलाश भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. येथे एक महिला आणि तीन पुरुषांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. आता संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. पोलीस कैलाश भवनात चौकशी करत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावले. सर्व मृतदेह हाती घेण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.