Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Tuljabhavani : अरे देवा! तुळजाभवानीचा सोन्याचा मुकूट गायब झाला आणि सोन्याच्या पादुका चक्क तांब्याच्या निघाल्या; चौकशीची मागणी

Tuljabhavani : अरे देवा! तुळजाभवानीचा सोन्याचा मुकूट गायब झाला आणि सोन्याच्या पादुका चक्क तांब्याच्या निघाल्या; चौकशीची मागणी

तुळजापूर : तुळजापूर येथील तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेत प्रचंड तफावत आढळून आली असून सोन्यात चक्क ५० टक्के तूट आढळली आहे. तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही मौल्यवान दागिने गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस आढळले. तर मातेला वाहण्यासाठी आणलेल्या ४ तोळ्याचा सोन्याच्या पादुका चक्क ताब्यांच्या असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही केवळ ऐकीव माहिती नसून तसा अहवाल दागिने मोजदाद व तपासणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.


तुळजाभवानी मंदिर संस्थानने (Tuljabhavani Mandir Sansthan) कुणालाही पाठिशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केली आहे.


तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन दागदागिन्यांची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे.


तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. हे दागिने ३०० ते ९०० वर्षांपर्यंत जुने आहेत.


दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करत आहे. त्या समितीचा अहवालही एक-दोन दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल, असे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

Comments
Add Comment