Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीSpam E-mails : काय सांगता! आता स्पॅम ईमेल्स येणार नाहीत? ते कसं...

Spam E-mails : काय सांगता! आता स्पॅम ईमेल्स येणार नाहीत? ते कसं काय?

गुगल घेणार ‘या’ गोष्टीची मदत…

मुंबई : गुगलची ई-मेल (Google E-mails) ही अधिकृतरित्या माहिती पाठवण्यासाठी किंवा औपचारिक कामांसाठी (Official Works) उत्तम सुविधा आहे. पण यावर अनेक स्पॅम ई-मेल्स (Spam E-mails) येऊ लागले तर ती त्रासदायक वाटते. त्यामुळे जी-मेल स्टोरेजही संपूर्ण भरुन जाते, शिवाय हे ई-मेल्स काही कामाचेही नसतात. अशा स्पॅम ईमेल्सना आळा घालण्यासाठी गुगल आता एआय (AI) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) मदत घेणार आहे. ज्यामुळे युजर्सची स्पॅम ईमेल्सपासून सुटका होणार आहे.

गुगल एक नवीन एआय पावर्ड स्पॅम डिटेक्शन सिस्टीम (Spam Detection System) तयार करणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या आयडिया करुन सिक्युरिटी फिल्टरला चकवणाऱ्या स्पॅम मेल्सना दणका बसणार आहे.

गुगल सध्या स्पॅम मेल्स डिटेक्ट करण्यासाठी RETV म्हणजेच रेसिलियंट अँड इफिशिअंट टेक्स्ट व्हेक्टोरायझर या फिल्टरचा वापर करतं. यामध्ये ई-मेल मध्ये काणते शब्द वापरण्यात आले आहेत, त्यांच्या आधारे ते शब्द स्कॅन करुन जीमेल, यूट्यूब आणि गुगल प्ले या ठिकाणी हार्मफुल कंटेंट फिल्टर केला जातो. पण केवळ शब्द फिल्टर करता येत असल्याने ईमेल कंटेंटमध्ये स्पेशल कॅरेक्टर, इमोजी, टायपो अशा प्रकारची काहीतरी शक्कल लढवून या फिल्टरची दिशाभूल केली जात होती.

आता गुगल याच सॉफ्टवेअरला एआयच्या मदतीने अपडेट करणार आहे. नवीन अपडेटेड फिल्टरमध्ये फिशिंग मेल्सना थांबण्यासाठी निश्चित अशा शब्दांना चाळण्याची गरज भासणार नाही. तसंच हे एआय टूल १०० हून अधिक भाषांवर आउट-ऑफ-दि-बॉक्स काम करणार आहे.

जीमेलचं हे नवीन स्पॅम डिटेक्शन टूल अँड्रॉईड (Android), आयओएस (IOS) आणि वेब व्हर्जन (Web version) अशा सर्व ठिकाणी काम करणार आहे. यामुळे यूजर्सपर्यंत स्पॅम मेल्स पोहोचणार नाहीत. दरम्यान, गुगलने आपल्या यूजर्ससाठी नवा सिक्युरिटी अपडेट दिला आहे. यामुळे विविध प्रकारच्या ८५ त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरमधील हा सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल करण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -