Monday, January 20, 2025
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?

Nitesh Rane : उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?

आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा

आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार

मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) केवळ एका राज्यात विजय मिळवता आला. तर इतर तीन राज्यांमध्ये भाजपचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोयीस्कररित्या ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या या शंकेला भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरुन चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील ठाकरे व राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नितेश राणे म्हणाले, चार राज्यांचे निकाल लागले आणि तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. यानंतर लगेच उद्धव ठाकरे आणि त्यांचा कामगार संजय राऊत एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असा आग्रह करायला लागले. मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीनंतर का केला नाही? मातोश्रीची मम्मी रागावेल म्हणून? मग २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये जेव्हा मोदीसाहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे १८-१८ खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

संविधानाच्या एवढ्या गप्पा मारता मग तुमच्या उबाठामध्ये तरी संविधान आहे का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर दोघांनीही आपल्या विधानपरिषद आणि राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं. संविधानाच्या गप्पा मारता मग आम्ही जे ऐकतोय की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे, मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसैनिक आधी आठवत नाहीत का? असा जळजळीत सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या. देशामध्ये संविधान आहे की नाही हे विचारण्याअगोदर आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा आणि मग दुसर्‍यांना सल्ले द्या, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -