
मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
पुणे : बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ (Michaung Cyclone) तयार झाल्याने तामिळनाडू (Tamilnadu) आणि आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यात आता मिचाँगचा धोका आणखीनच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मिचाँग चक्रीवादळाने जमिनीवर धडक दिल्याने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून ९,००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे विशाखापट्टणमच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईमध्ये पुराच्या पाण्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तर पाणी साचल्यामुळे अनेक भागातला वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
स्कायमेटच्या (Skymate) अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मिचाँग चक्रीवादळ आणखी उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
After deluging North #TamilNadu and South Coastal #AndhraPradesh, the cyclone weakened post-landfall, degrading into a depression. Despite reduced strength, heavy rains persist in East Telangana and Andhra Pradesh.#Skymet #WeatherUpdate #ChennaiFloods2023 #CycloneMichuang #Rain
— Skymet (@SkymetWeather) December 6, 2023
दरम्यान मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढलेली पिके झाकून ठेवावीत असा, सल्लाही देण्यात आला आहे.
मिचाँग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांवरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या २४ तासांत तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. दक्षिण ओडिशामध्ये एकाकी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडला. छत्तीसगड, ओडिशा, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस झाला. बिहार, झारखंड, विदर्भ, गंगेचे पश्चिम बंगाल, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलका पाऊस झाला.
पुढील २४ तासांमध्ये संभाव्य हवामान अंदाज...
पुढील २४ तासांत, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, दक्षिण बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.